पिंपरी – शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनाही पिंपरीकर नागरिक वैतागले आहेत. पिंपरी पोलिसांनी वाहन चोरी टोळीनं आळा घालण्याची मागणी सर्वमान्यकडून केली जात आहे. शहरात नुकतेच सात दुचाकीच्या एका टेम्पो चोरीला गेल्याची तक्रारी पोलीस स्थानकात दाखल झाल्या आहेत.
सहाराच्या विविध भागात या घटना घडल्या आहेत. यामध्ये श्रीराम मारुती भोसले (वय ५५, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो त्यांच्या राहत्या घराच्या सोसायटीसमोर रस्त्यावर पार्क करण्यात आला होता . अज्ञातांनी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली होती. याशिवाय चाकण, निगडी, भोसरी, पिंपरी, दिघी, तळेगाव दाभाडे आणि चिखली पोलीस ठाण्याच्याहददीतून दुचाकींची चोरी झाल्याचे समोर आले आहे.
गस्ती पथक नेमावे
सातत्याने होत असलेल्या याचोरीला नागरिक वैतागले असून पोलीस प्रशासनाने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी गस्ती पथक नेमण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. रात्री घराबाहेर पार्क केलेलं वाहन सकाळी उठेपर्यंत गायब झालेली असतात. अनेक नागरिकांच्या मनात याची धास्ती निर्माण झाली आहे.