Video | घाटात वाहनावरील ताबा सुटला अन् अनेक वाहनांना उडवत तो…अपघाताचा थरार सीसीटीव्हीत

| Updated on: Nov 21, 2023 | 10:27 AM

Pune Accident | पुणे कोलाड महामार्गावर पिरंगुट येथील घाट उतारावर मोठा अपघात झाला. भरधाव टेम्पोने पाच दुचाकी व एका चार चाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर मुळशी येथील नागरिक आक्रमक झाले आहे.

Video | घाटात वाहनावरील ताबा सुटला अन् अनेक वाहनांना उडवत तो...अपघाताचा थरार सीसीटीव्हीत
पिरंगुट घाटात या टेम्पोने अनेक वाहनांना उडवले
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

रणजित जाधव, पुणे दि. 21 नोव्हेंबर | पुणे आणि परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील कोलाड महामार्गावर पिरंगुट येथील घाटात मोठा अपघात झाला. घाटातील उतारावर सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव असणाऱ्या त्या टेम्पोने पाच दुचाकी व एका चार चाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. टेम्पो चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौंड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर मुळशीतील नागरिक आक्रमक झाले आहे. त्यांनी पुणे जिल्हाधिकारींनी त्वरित पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय.

नियंत्रण सुटल्यानंतर अनेक वाहनांना उडवले

मुळशी तालुक्यातील कोलाड पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात तीव्र उतारावर 20 नोव्हेंबर रोजी अपघात झाला. एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे त्याने एकामागे एक असा अनेक वाहनांना उडविले. या अपघातात प्रवासी आणि पादचारी गंभीर जखमी झालेत तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. गंभीर अवस्थेत त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे. उर्वरित सहाजखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे.

हे सुद्धा वाचा

घाटात अवजड वाहनांच्या अपघातांची मालिका

पिरंगुट घाटात अवजड वाहनांच्या अपघातांची मालिकाच सुरु आहे. परंतु स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. उतारावर अपघात रोखण्यासाठी कोणत्याच उपाययोजना प्रशासनाकडून होत नाही. दर आठवड्यात या ठिकाणी अपघात होत असतो. सोमवारी मालवाहू टेम्पोचा ताबा सुटून पाच दुचाकी आणि एका कारचा अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पिरंगुट घाटात अपघाताची मालिकेमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहेत. शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत. त्यामुळे मुळशीतील नागरिक आक्रमक झाले आहे. त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी केलीय.