पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune News) असंख्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यामधील शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दर पाच वर्षांनी चारित्र्य पडताळणी होणार आहे. शाळेतील मुलींवर अत्याच्यार होण्याच्या वाढत्या घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेशही प्रशासनाकडून शाळांना देण्यात आले आहेत. भिगवण (Bhigwan) इथं जिल्हा परिषदेच्या (ZP School) शाळेतील मुलीवर अत्याचारी घटना उघडकीस आली होती. त्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, दर्शनी भागात हेल्पलाईन नंबर लावणं, तक्रार पेटी ठेवणं, यासारख्या उपाययोजना करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसंच विद्यार्थ्यांनाही गुड टच-बॅड टच याबाबत प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शाळेत मुलींवर होणारे अत्याचर थांबतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
पालकांच्या लेखी परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीला भेटू देऊ नये, असंही आदेशात म्हटलंय. त्याबाबत सुरक्षारक्षकांनाही माहिती दिली जावी, असंही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आवाहन करत शाळांना सूचना दिल्यात. लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानं शाळेनं पीडितेची बाजू घेत तिला मदत करावी. लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयांनाही द्यावी. विद्यार्थ्यांना गोपनीयरीत्या तक्रार नोंदवता कशी येईल, याची तजवीज करावी. सिक्युरीटी बेल बसवाव्यात. विद्यार्थ्यांचे हात पोहोचतील अशा उंचीवर या बेल बसवल्या जाव्यात. एखादी तक्रार प्राप्त झाल्यास त्याववर त्वरीत कार्यवाही करावी. चाईल हेल्पलाईन नंबर 1089, पोलिसांचा नंबर 100, महिला सुरक्षा नंबर 1090 आणि इमर्जन्सी नंबर 112 याबाबतचे फलकही लावले जावेत, अशा सूचना प्रशासनाकडून केल्या जाव्यात.
भिगवणमध्ये झेडपीच्या शाळेतील एका विद्यार्थीनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्याने एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीने केलेल्या तपासणीत शिक्षण दोषी आढळून आला होता. त्यानंतर नराधम शिक्षकाचं निलंबनही करण्यात आलं होतं. या घटनेची जिल्हा परिषद प्रसशानाच्या वतीने गंभीर दखल करण्यात आलं होतं.