पुणे- शहरात मागील काही महिन्यापासून मुलींवरील अत्याचारच्या (Atrocities against girls)घटना वाढत आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकू हल्लाची घटना ताजी असतानाच, शिवाजीनगर(Shivaji nagar) परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आली या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी(Police) अटकही केली. मात्र या प्रकरणामुळे शहरातला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ‘आप’ पालक युनियने या बलात्काराचा ‘मूक निषेध’ म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. पुण्यासारख्या स्मार्ट सिटीत अडीच महिन्यात 61 बलात्कार झाले आहेत. प्रशासन काय करतंय अशी टीका यावेळी करण्यात आली.
फलकांद्वारे केला निषेध
आप पालक संघटनेने शाळेच्या परिसरात प्रशासनाचा निषेध केला. हातात फलक प्रशासनाच्या तसेच शाळेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. शहारात कार्यरत असलेल्या दामिनी भरोसा सेल काय करतात? एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असताना दुसरीकडे महिलांवरील गुन्ह्यांची संख्या लक्षणीय पद्धतीनं वाढताना दिसत आहे.
पालकांच्या मनात दहशत
घरानंतर शाळा सर्वात सुरक्षिती ठिकाण असते. मात्र अलीकडे शाळेतच मुलींवर हे प्रसंग ओढवत आहे. त्यामुळे आता शाळाही सुरक्षित नाही असा समज पालकांच्या मनात निर्माण होवू लागला आहे. याबरोबरच शाळेत गेलेली आपले पाळ्या सुरक्षित असतील का? याचे चिंता पालकांना मुले शाळेतून घरी येईपर्यंत सतावत असते. या पद्धतीने वाढत असलेल्या गुन्हेगारी, अत्याचारी प्रवृत्तीना ठोकून काढण्यासाठी प्रशासनाने योग्य टी पावले उचलावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
वेळ राखून ठेवा किंवा ॲडजेस्ट करा, असं आहे IPL 2022 मधलं मुंबई इंडियंसचं पूर्ण शेड्यूल