नवरा-बायकोचे भांडण, राग शहरावर, पुणे शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

| Updated on: May 13, 2024 | 4:18 PM

Pune Crime News: पत्नीच्या प्रेमात पडलेल्या या व्यक्तीने बायको नांदण्यासाठी येत नसल्यामुळे पुणे पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना मिळालेल्या या धमकीमुळे पुणे पोलिसांना जोरदार धक्का बसला.

नवरा-बायकोचे भांडण, राग शहरावर, पुणे शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
Follow us on

पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून शहर वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. नवरा-बायकोच्या भांडणाचा राग शहरावर काढण्याचा प्रकार घडला आहे. पत्नीच्या प्रेमात पडलेल्या या व्यक्तीने बायको नांदण्यासाठी येत नसल्यामुळे पुणे पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना मिळालेल्या या धमकीमुळे पुणे पोलिसांना जोरदार धक्का बसला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पुण्यात गुन्हेगारी वाढली

पुणे शहरात मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. यापूर्वी कोयता गँगने पुणे शहरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता गोळीबारच्या घटना मागील महिन्यात चार वेळा घडल्या. गुन्हेगारीप्रमाणे कौटुंबिक वाद आणि कलहसुद्धा समोर येत आहे. किरोकळ कारणावरुन कुटुंबात वाद होत आहे. काही दिवसांपूर्वी एका कुटुंबामध्ये चिकनसाठी भांडण झाले होते. त्यानंतर आईने आणि मुलींनी मिळून बापाला चोपून काढले होते. आतादेखील किरोकोळ कारणावरुन शहराला वेठीस धरण्याचा प्रकार आला आहे. त्या व्यक्तीने बायकोचा राग काढण्यासाठी बॉम्ब करण्याची धमकी दिली.

हे सुद्धा वाचा

काय होता प्रकार

पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला. बायको नांदण्यासाठी परत आली नाही तर पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी त्या फोनमधून देण्यात आली. त्या व्यक्तीने सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली. पुणे पोलीस लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या बंदोबस्तात व्यस्त असताना हा धमकीचा फोन आला.