Pune Crime News: पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक बातमी आली आहे. सावकारी जाचामुळे एका रिक्षाचालक तरुणाने आपले जीवन संपवले. त्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ तयार केला. त्यावर भावनिक आवाहन करताना घरातील परिस्थिती आणि सावकाराकडून होणारा त्रास मांडला. त्यानंतर गळफास घेत त्या तरुणाने आपले लाखमोलोचे जीवन संपवले. राजू राजभर असे त्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार सावकराकडून त्रास होत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात निगडी पोलिसांनी रजनी सिंग, राजीव कुमार,महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी राजू कुमार आणि रजनी सिंग या दोघांना अटक केली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
राजू राजभर यांनी म्हटले की, मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आपले जीवन संपवण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा, असे भावनिक आवाहन करत राजू नारायण राजभर या तरुणाने चिंचवड येथील साईनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
राजू राजभर यांनी रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराची नावे दिली आहे. त्यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहित राजू राजभर या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
आपले जीवन संपवण्यापूर्वी राजू राजभर यांनी त्यांची पत्नी आणि लहान मुलीबाबत चिंता मांडली आहे. ते म्हणाले, माझ्या छोट्या मुलीला सांभाळा. माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला माझा अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत करा.