पुणे शहरात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यावर झाली नाही. रेल्वेतील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर झाली आहे. रेल्वेत ट्रॅक मेंटेनर असलेल्या सेवानिवृत्त ट्रॅकमनकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता मिळाली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जप्त केल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने त्याला अटक केली. मल्लिनाथ भीमाशंकर नोल्ला (रा.चिंचवड) असे त्याचे नाव आहे. सीबीआयच्या पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
मल्लिनाथ रेल्वेच्या अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) विभागात ट्रॅक मेंटेनर होता. खडकी स्थानकात कार्यरत असताना २०२३ मध्ये तो सेवानिवृत्त झाला. त्याने २००८ ते २००३ दरम्यान मोठ्या प्रमाणावर स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वत:च्या तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती त्याने जमवली. त्याच्याकडे सहा फ्लॅट, सहा दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. त्याच्याकडे मोकळे प्लॉट, जमीन, इमारत आहेत. त्याचे वेतन आणि संपत्तीच्या व्यवहारात मोठी तफावत आहे. तसेच त्यांच्याकडे मोठी रक्कम बचत आहे.
मल्लिनाथ याच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका वर्षासाठी तडीपार केले होते. मल्लिनाथ याने दोन कोटीपेक्षा जास्त किमतीची संपत्ती जमवली आहे. त्याला दोन पत्नी आहे. तसेच त्याचा मुलगा, मुलगी, सूनेकडे उत्पन्नाचे साधन नाही. 2008 ते 2023 दरम्यान त्याने तब्बल 60 लाख वेतन बचत केले आहे.
रेल्वेतील एका साध्या ट्रॅकमन मोठी संपत्ती मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ही संपत्ती त्याने कशी जमवली, याची माहिती सीबीआय चौकशीतून बाहेर येणार आहे. परंतु या प्रकाराची चांगली चर्चा सुरु झाली आहे. सीबीआयकडून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यात त्याची पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.