पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून शहरात अल्पवयीन मुलींच्या अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. शहरात काही दिवसांपुर्वीच सामूहिक बलात्कारची घटना ताजी असतानाच हवेली तालुक्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचेसमोर आले आहे. धक्कादायक बाबा म्हणजे पित्यानेच या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.
नेमकं काय घडल
पीडित अल्पवयनी मुलगी आपल्या आई- वडिलांच्या सोबत वास्तव्याला आहे. मुलीचे आई -वडील दोघेही मजुरीचे काम करतात. मागील काही दिवसांपासून पिडीत मुलीचा बापाचं तिचे शोषण करत होता. मात्र याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी देत होता. मारून टाकण्याच्या भीतीने पीडित मुलगी सगळं सहान करत राहिली. मात्र अखेर त्राससहन न झाल्याने तिने घडत असलेल्या सर्व याप्रकारची माहिती आपल्या आई दिली.
या घटनेने धक्का बसलेल्या आईने थेट पोलिसात धाव घेत बापाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ते 24 डिसेंबर दरम्यान आरोपी बापाने अनेकदा पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. पोलिसांनी बापाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम बापाला अटकही करण्यात आली आहे.
जवळच्या व्यक्तीच करता विश्वास घात
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, दुसरीकडे हे अत्याचार ओळखीतील लोकांकडूनच केले जात असल्याचे समोर आले आहे. अनेक घटनांमध्ये कुटुंबातील व्यक्ती, जवळचा नातेवाईक , मित्रपरिवार यांचा समावेश असल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Video : वरातीवेळीच नवरदेवाची पॅन्ट फाटली! लग्नात उपस्थित लोकही पोट धरुन हसले
तीन महिन्यांचा पगार मागितल्याचा राग, मालकाने तरुणाला जिवंत जाळलं