पुणे – भोरमध्ये आयडीबीआय बँकेत खोटे सोने तारण ठेवून बँकेची 38 लाख 18 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी तीन कर्जदार, दोन सोनाराच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्जदार विद्याधर टापरे, गणेश माजगुडे, विकास सावंत यांनी सोनार नंदकुमार कांबळे आणि चेतन बेलापूरकर यांच्या मदतीनं कर्ज घेतले. कर्ज घेताना बँकेचे शाखाधिकारी कुंदन तिवारी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कर्ज मंजूर केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून झालेल्या फेर तपासणीत बँकेकडे तारण ठेवलेले सोने खोटे असल्याचं सिद्ध झाले. या पाचही जणांविरोधात भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलं करण्यात आलाय.
अज्ञात चोरट्यांनी लांबवली पर्स
चोरट्यांनी सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. सीमा हंबीरराव आडनाईक (वय 40, रा. सहकारनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी दिली आहे. फिर्यादी मंगलकार्यालयात कार्यक्रमासाठी गेले होते. त्याचा वेळी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीने पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख 22हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
मंगळसूत्र हिसकावले
मोशी – चिखली रोडवर 37 वर्षीय महिलेची 30 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. पतीसोबत दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली आहे. घटने दरम्यान दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.
AUS vs ENG Ashes 2nd Test Day 2: लाबुशेनचे शानदार शतक, ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत
माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे बदल करा आणि तत्काळ फळ मिळवा!
HDFC लाईफची निवृत्ती योजना, पॉलिसीच्या सुरुवातीलाच वार्षिक व्याज करा लॉक, इतरही अनेक फायदे