देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. कोयाता गँग सक्रीय आहे. किरकोळ कारणांवरुन कोयता हल्ले झाल्याचे अनेक घटना पुणे शहरात घडल्या आहेत. आता त्यापुढे जाऊन गोळीबाराच्या घटनाही वाढल्या आहेत. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. आता पुन्हा गोळीबार झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या भुमकर चौकात आज पहाटे अडीच वाजता गोळीबार झाला आहे. कडीपेटी मागितल्याच्या कारणातून गोळीबार झाला आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे.

पुणे शहरातील जंगली महाराज रोडवर दोन दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या हेल्मेट घातलेल्या दोघांनी हा प्रकार केला होता. त्या दोघे हल्लेखोरांनी दोन वेळा फायर करण्याचा प्रयत्न केला. परंतु फायर झाले नव्हते. हा प्रकार त्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तसेच हडपसरमध्येही दोन सैनिकांमध्ये वाद झाला. त्यातून भर रस्त्यात गोळीबार शेवाळवाडी परिसरात झाला होता. त्यात जयवंत खलाटे हे जखमी झाले होते. या प्रकरणात सुधीर रामचंद्र शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
पुणे परिसरात काही महिन्यांपूर्वी कोयता हल्ले वाढले होते. कोयता गँगची दहशत तयार झाली होती. किरोकोळ कारणांवरुन हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोयता गँगविरोधात कठोर कारवाई सुरु केली. आता गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत.
जानेवारी महिन्यात गुंड शरद मोहळ याच्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाल्या होता. त्यानंतर इंदापूरमध्ये गुंड अविनाश बाळू धनवे (रा. आळंदी) याच्यावर हॉटेलमध्ये जेवण्यास बसलेला असताना गोळीबार झाला होता. आता गुरुवारी पहाटे गणेश गायकवड याच्यावर गोळीबार झाला. काडीपेटी मागितल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.