पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुण्यातील आंबेगाव तालुक्यातच एका सराईत गुन्हेगारावार गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण भरदिवसा रस्त्यावर ही हत्या करण्यात आली आहे.
संबंधित घटना ही आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावात घडली. एकलहरे गावातील रस्त्यावर भर दिवसा कुख्यात गुंड ओंकार याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गुन्हेगारांना पोलिसांची काहीच भीती राहिलेली नाही. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. पूर्ववैमनस्यातून ओंकारची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. संबंधित घटना ही गावात घडल्याने सीसीटीव्ही फुटेजची मदत आता पोलिसांना मिळणार नाही. त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळणे हे पोलिसांपुढील मोठे आहे.
विशेष म्हणजे आंबेगाव तालुक्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलं गुन्हेगारिकडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. तसेच अनेक गुन्हेगार हे पंचवीशीतले आहेत. तरुण पिढीच अशाप्रकारे गुन्हेगारी विश्वाकडे वळत असेल तर एकंदरीत राज्य आणि देशाचं भविष्य काय असेल? हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे या गुन्हेगारीला मुळासकट छाटण्याचं पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे.
हेही वाचा :
20 बॉडीगार्डच्या गराड्यात राहायचे गोल्डमॅन दत्ता फुगे, पुण्यात दगडाने ठेचून झाली होती हत्या
गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलाला कानाखाली मारल्याचा राग, पुण्यात तरुणाची हत्या