पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर(Sushil Khodavekar)चा अंतरिम जामीन अर्ज(Interim Bail Application) न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर खोडवेकर यांनी ॲड. एस. के. जैन व ॲड. अमोल डांगे यांच्यामार्फत अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या जामीन अर्जास सायबर पोलिसांच्या वतीने सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला आहे. आरोपी प्रभावशाली पदावर काम करत असून, त्याच्या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपलेला नाही. राज्य सरकार त्याच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आरोपीला जामिनावर मुक्त करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील जाधव यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि आरोपीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर खोडवेकर यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. (IAS officer Sushil Khodvekar’s interim bail application rejected by court)
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर याला ठाण्यातून अटक केली होती. शिवाजीनगर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. सुशील खोडवेकर 2009 च्या बॅचचा आयएएस अधिकारी असून त्याने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून काम केलं आहे.
टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याने सुशील खोडवेकरच्या सांगण्यावरून जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले आणि कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट दिल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर सुशील खोडवेकरला अटक करण्यातआली.
राज्यातला टीईटी घोटाळा समोर आल्यानंतर पुणे पोलिसांची नजर आता बीड जिल्ह्यावर आहे. बीड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र पैसे देऊन आणल्याचा संशय आहे. त्यामुळे तब्बल 124 शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पडताळणी झाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांत धाकधूक वाढली आहे. (IAS officer Sushil Khodvekar’s interim bail application rejected by court)
इतर बातम्या