पुणे | 5 ऑगस्ट 2023 : सोशल मीडियावरुन मैत्री करुन फसवण्याचे अनेक प्रकार समोर येऊ लागले आहेत. पुणे शहरात शिक्षण घेतलेल्या एका युवतीला फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. मैत्री करुन त्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मग तिच्यासोबत फिरणे त्या युवकाने सुरु केले. हॉटेलमध्ये नेऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरु केले. अगदी शिक्षण सोडून दे, अन्यथा फोटो सोशल मीडियावर टाकेल, अशी धमकी दिली. अखेर युवतीने पोलीस ठाणे गाठत त्या युवकाविरुद्ध तक्रार केली.
पुणे शहरात शिक्षण घेत असताना एका १९ वर्षीय युवतीची इंस्टाग्रामवर इम्रान शकील अब्बासी या युवकांशी २०२० मध्ये मैत्री झाली. हा युवक मध्य प्रदेशातील रतलाममधील होता. त्यानंतर दोघांची चॅटींग सुरु झाली. हळहळू फोनवर बोलणे सुरु झाले. दोघे जण एकाच शहरातील निघाले. मग इम्रान याने त्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी संबंध निर्माण केले.
जुलै २०२२ मध्ये त्या युवतीचा वाढदिवस होता. त्यावेळी ती गुजरातमध्ये बडोद्यात परीक्षा देण्यासाठी गेली होती. मग इम्रानही बडोद्यात दाखल झाला. दोघे एका हॉटेलमध्ये थांबले. ऑगस्ट २०२२ मध्ये ती युवती पुणे शहरात परत आली. त्यानंतर इम्रान याने तिला इतर मुलांशी बोलू नको, तुझे शिक्षणही सोडून दे, असे म्हणायला सुरुवात केली. युवतीने या गोष्टींना विरोध केल्यावर तिला ते फोटो दाखवत व्हायरल करण्याची धमकी दिली.
युवतीने इम्रानकडून होणाऱ्या त्रासामुळे जानेवारी २०२३ मध्ये तिच्याशी संबंध तोडले. त्यामुळे इम्रान तिच्या घरी पोहचला. तिच्या कुटुंबियांना धमक्या देऊ लागला. त्याने श्रेयासिंह नावाने सोशल मीडियावर फेक अकांऊट तयार केले. त्यावरुन आक्षेपार्ह फोटो टाकण्याची धमकी दिली.
प्रकरण वाढल्यानंतर युवतीने रतलामधील पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. सायबर सेलच्या मदतीने आरोपीला ट्रेस केले. त्यानंतर त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.