पुणे- गेल्या काही दिवसांपासून शहरात दरोड्याबरोबरच भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील कोलवडी मांजरी खुर्द रोडवरील द्वारका मेडिकल व श्री दत्त क्लिनिकमध्ये चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे. चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांना मेडिकलमध्ये पैसे न मिळाल्यानं कॅडबरी, चाॅकलेट यासारख्या वस्तूची चोरी केली आहे.
सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद
चोरी करण्यात आलेल्या मेडिकलमधील सीसीटीव्हीमध्ये या चोरीच्या घटना कैद झाल्या आहेत. सीसीटीव्हीत जर्किंग घालेले तोंडाला काळा रुमाल बांधलेले तीन इसम दिसून आले आहेत. चोरट्यांनी प्रथम कटावणीच्या साहाय्यानं शटर उचकटत आता प्रवेश केला आहे. त्यानंतर आतमध्ये जवळपास अर्धा पाऊण तास उचकापाचक करत शोध घेतला. यामध्ये चोरट्यांना फारसे पैसे आढळून न आल्यानं मेडिकलमधील कॅडबरी, चाॅकलेट चोरट्यांनी पळवल्या आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस स्थानकात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील दिवसांपूर्वी शहरातील धनकवडी परिसरातील गणेशनगर भागातही जबरी चोरीची घटना उघडकीस आली होती. यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटला होता. तसेच कोंढवा परिसरात आयएएस अधिकाऱ्याच्या घर झालेल्या चोरीत साधारणपणे १५३ तोळे दागिने लुटून नेल्याची घटना उघडकीस आली होती.
संबंधित बातम्या:
आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत पडळकरांनी केले जेवन
कांदा करणार वांदा, आयातीला शेतकरी संघटनेचा विरोध; व्यापारी-आडत्यांना धडा शिकवण्याचा इशारा