दौंड : फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात रविवारी ही घटना घडली. या प्रकरणातील आठही आरोपी पसार झाले आहेत. (Pune Daund Two Youngsters killed for asking reason of abusing)
जाब विचारल्याने दोघांची हत्या
शिवम संतोष शितकल (वय 23) गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता. दौंड, जि. पुणे) अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत. फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखंडा येथील भानोबा मंदिरासमोर रविवारी रात्री ही घटना घडली.
आठही आरोपी फरार
या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे रात्रीपासून पाटस गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, मोहन टुले योगेश शिंदे आणि इतर पाच अनोळखी युवकांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पाटस गावामध्ये रात्रीपासून तणाव निर्माण झाले आहे.
पाण्यावरील वादातून तरुणाला रेल्वेबाहेर फेकले
दुसरीकडे, गोवा एक्स्प्रेसमध्ये पिण्याच्या पाण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. मनमाडकडून पुण्याकडे जाणारी गोवा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्यामुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे दौंड रेल्वे स्टेशनला आली. गजानन राठोड याने नितीन जाधवकडे पिण्यासाठी बाटलीतील पाणी मागितले. मात्र नितीनने पाणी दिले नाही. या किरकोळ कारणावरुन गजानने नितीनच्या कानफटात मारली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
धावत्या ट्रेनमधून खाली फेकले
केडगाव स्टेशन येण्याच्या अगोदर गजाननला नितीनने रेल्वे डब्यातील स्वच्छतागृहाजवळ आणले आणि धावत्या गाडीतून त्याला खाली ढकलून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आरोपी नितीन जाधवला पोलिसांनी अटक केली
संबंधित बातम्या :
धावत्या रेल्वेमध्ये बाथरुम 5 वर्षांचा मुलगा अडकला, आरपीएफ जवानांनी सुटका करण्यासाठी काय केलं?
पाण्यावरुन किरकोळ वाद, 33 वर्षीय प्रवाशाचा ट्रेनबाहेर फेकल्याने मृत्यू, पुण्यातील प्रकार
(Pune Daund Two Youngsters killed for asking reason of abusing)