पुणे : दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण (College Student Assault) केल्याप्रकरणी पुण्यात इंजिनिअरिंगच्या 12 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल (Pune Engineering Students) करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर (Loni Kalbhor) भागातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. शुक्रवारी संध्याकाळी कॉलेजच्या इमारतीजवळ ही घटना घडली होती. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली.
काय आहे प्रकरण?
मारहाणीत जखमी झालेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने शनिवारी सकाळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी कॉलेज कॅम्पसमध्ये दुपारी 4.30 ते संध्याकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
जखमी झालेले दोन्ही तरुण इंजिनिअरिंगचे दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. तर मारहाण आणि छळ करणारे आरोपी तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
वेलकम पार्टीमध्ये राडा
10 डिसेंबर रोजी पुण्यातील मुंढवा भागातील एका बड्या हॉटेलमध्ये कॉलेजच्या फ्रेशर्ससाठी वेलकम पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोपी बारा विद्यार्थी आणि दोघा तक्रारदार विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. पार्टीमध्येच दोन गटांमध्ये हमरीतुमरी झाली होती.
सूड उगवण्यासाठी मारहाण
बारा विद्यार्थ्यांनी पार्टीतील वादावादीचा सूड उगवण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार दोघा विद्यार्थ्यांना कडं आणि विटांनी मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित बातम्या
Mumbai Crime : अंधेरीत डान्स बारवर मुंबई पोलिसांचा छापा, तळघरातून 17 मुलींची सुटका
Mumbai Lift Accident | मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, पाच जण गंभीर जखमी
Rickshaw Accident | धावती रिक्षा उलटून दोन वेळा पलटी, नांदेडमध्ये अपघात, 9 विद्यार्थिनी जखमी