पिंपरी चिंचवड : सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने मावशीने सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर सासूचा मृतदेह पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला टाकून देण्यात आला होता. या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मावशीने सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने आपल्या सासूचा काटा काढण्याचा प्लॅन आखला होता. हत्येनंतर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला तिचा मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणाची गुन्हे शाखा युनिट दोन आणि देहूरोड पोलिसांनी उकल केली आणि सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या.
सराईत गुन्हेगाराला अटक
या प्रकरणी इम्तियाज ऊर्फ चिंट्या मुस्ताक शेख या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. तर मुन्नी जोगदंड असे आरोपी मावशीचे नाव आहे. दोघांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमला पोलीस आयुक्तांनी 40 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पुण्यात प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे फेकले
दुसरीकडे, प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरुन फेकणाऱ्या प्रियकरालाही पुण्यात अटक करण्यात आली आहे. तब्बल बारा दिवसांनंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. तीस वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी 40 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रेयसीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिंदे याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हनुमंत अशोक शिंदे (वय 40 वर्ष, रा. बुधवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी (वय 30 वर्ष, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हनुमंतने प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्यानंतर ते पोत्यात भरुन पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिले होते.
संबंधित बातम्या :
आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाची आत्महत्या
प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे मुठा घाटात फेकले, पुण्यात 40 वर्षीय प्रियकराला अटक