पिंपरी चिंचवड : 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. कोणाला सांगितले तर जीवे ठार मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेले काही महिने हा प्रकार सुरु होता, मात्र पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर नराधम बापाला वाकड पोलिसांकडून अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण
नराधम बापाने मुलीचे कपडे काढून तिच्यासोबत जबरदस्तीने संभोग करण्याचा प्रयत्न केला. जर तू कोणाला सांगितलेस, तर मी तुला जीवे ठार मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या लैंगिक अवयवांना वारंवार हात लावून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन बापाने केल्याचं समोर आलं आहे.
ठाण्यात बापाचे सावत्र मुलीवर अत्याचार
दुसरीकडे, मुंब्र्यातील रशिद कंपाऊंड येथील भाड्याच्या घरात 44 वर्षीय नराधम आपली पत्नी आणि सहा वर्षीय सावत्र मुलीसोबत रहात होता. मुलीची आई बाहेर जाताच नराधम सावत्र बाप पीडित मुलीला अमानुष मारहाण करुन तिच्या सर्वांगावर माचीस आणि मेणबत्तीचे चटके देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करायचा.
पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने जवळपास सहा महिने होत असलेले अमानुष कृत्य तिने कोणालाच सांगितले नाही. परंतु, या प्रकाराची माहिती परिसरातील स्त्रियांना कळताच त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली आणि घडत असलेला प्रकार विचारला. काही वेळाने धीर आल्याने चिमुकलीने आपला सावत्र बाप आपले कसे शोषण करत होता, याचा पाढाच वाचला. कसा आपला नराधम सावत्र पिता माचीसचे चटके देत होता आणि आपल्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके देऊन बलात्कार करत होता याची माहिती दिली.
संबंधित बातम्या :
प्रियकराच्या लग्नामुळे प्रेयसीचा संताप, नववधूचे केस कापले, डोळ्यात फेविक्वीक ओतलं
प्रेमात अडथळा ठरत असल्याने नवऱ्याचाच केला खून; दीर-भावजयीला बेड्या
चोरीची घटना लपवण्यासाठी 9 वर्षाच्या मुलाची हत्या, नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार