पुणे : पुण्यात शिरुर भागातील लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. देह व्यापार सुरु असल्याच्या संशयातून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश केला. तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यात शिरुर भागातील सरदवाडी येथील ओम साई लॉजवर पोलिसांनी छापा घातला. महिलांकडून देह व्यापार करून घेत त्यामधून पैशाची कमाई करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला भरोसा सेलच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत या माहितीची सत्यता पडताळली. त्या आधारे छापेमारीची कारवाई करण्यात आली.
छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली, तर त्यांच्याकडून देहविक्री करुन घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लॉजचा मॅनेजर शिवकांत कश्यप आणि चालक पर्स परमार यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
नालासोपाऱ्यात चाळीत सेक्स रॅकेट
दुसरीकडे, नालासोपाऱ्यात चाळीतील खोलीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नुकतंच पोलिसांना यश आलं आहे. खोलीत तरुणींना डांबून ठेवून, त्यांना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप आहे. नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.
चार पीडित मुलींची सुटका
नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील खान कम्पाउंडमध्ये संबंधित महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती भाभी नावाने परिचित होती. वालीव पोलिसांनी छापा मारुन या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यातील चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दोन लाखांचे निरोध सापडले
अटकेतील आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा, तर एका महिलेचा समावेश आहे. वसुंधरा संजय तिवारी (वय 48) आणि अंजली राजकुमार यादव (वय 45) असे अटक आरोपींची नाव असून वसुंधरा तिवारी ही तृतीयपंथी आहे. या आरोपींकडून 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचे निरोध (कंडोम्स) असलेले 22 मोठे बॉक्स, रोख रक्कम आणि मोबाईल ही जप्त केले आहेत.
संबंधित बातम्या :
अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक
नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले