विनय जगताप, टीव्ही9 मराठी, वेल्हा, पुणे : अंधश्रद्धेला (Superstition) खतपाणी घालणारी घटना विद्येचं माहेरघर म्हणवलं जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात (Pune) समोर आली आहे. बाभळीच्या झाडाला स्त्री-पुरुषांचे फोटो चिकटवण्यात आले आहेत. त्यावर काळ्या बाहुल्या खिळ्यांनी ठोकल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. आजूबाजूला टाचण्या लावलेली लिंब आणि हळदी कुंकू दिसून आलं आहे. वेल्हा तालुक्यातील दापोडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या विरोधात पोलीसात तक्रार देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यात अंधश्रद्धा विरोधी विधेयक पास होऊन त्याचं कायद्यात रुपांतर झालाय, मात्र अंधश्रद्धेचे अघोरी प्रकार आजही सुरुच असल्याचं चित्र आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यात असाच एक प्रकार समोर आला आहे.
वेल्ह्यातील दापोडे गावातील शेतकरी रोहिदास कांबळे यांच्या शेतात बांधावर असणाऱ्या बाभळीच्या झाडाला अज्ञात स्त्री पुरुषांचे फोटो लावण्यात आले होते. त्यावर काळ्या बाहुल्या खिळ्यांचा सहाय्याने ठोकण्यात आल्या आहेत.तर आजूबाजूला टाचण्या लावलेली लिंब आणि हळदी कुंकू दिसून आलं आहे.
कांबळे शेतात कामं करण्यासाठी गेले असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. हा अघोरी प्रकार गावात समजताच गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
घडलेल्या प्रकाराची त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे. या विरोधात पोलीसात तक्रार देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
यवतमाळमध्ये जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न; एक गंभीर तीन किरकोळ जखमी
‘करणी केल्यानेच गाय मेली,’ ओल्या वस्त्रानिशी महिलेला मूर्तीवर टाकायला लावले पाणी