पुणे : पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती. तर अन्य नागरिकांनी घटनास्थळारुन थेट पळ काढला. या हत्याकांडामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आोरपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा अत्यंत रागामध्ये अल्पवयीन मुलीकडे आला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. मात्र आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार केल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा मानस या ओरपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
इतर बातम्या :
सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा चोरटा जेरबंद, आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार
धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरुन मुलाकडून आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या
जयपूरमध्ये सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार, आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल
Video : अजित पवारांच्या सहीचा कागद उद्या जाहिर करणार – किरीट सोमय्या@KiritSomaiya @AjitPawarSpeaks #kiritsomaiya #ajitpawar #maharashtrascams #proof pic.twitter.com/li31cW6tWw
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021