Pune Crime News: भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामा सतीश सादबा वाघ यांचे अपहरण करुन हत्या झाली. या प्रकरणाने पुण्यात चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणते मितभाषी, शांत स्वभावाचे असलेले सतीश वाघ यांचे कोणाशी वैर नव्हते. राजकारणाशी त्यांचा संबंध नव्हता. खूपच साधे व्यक्तीमत्व त्यांचे होते. त्यानंतर त्यांची हत्या कोणी केली असणार? असा प्रश्न आमदार योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांनी प्रतिक्रिया देताना उपस्थित केला. दरम्यान, सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी १६ पथके रवाना झाली आहेत.
सतीश वाघ हे शेतकरी कुटुंबातील आहेत. शेवाळवाडी भागात ते एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जातात. ते मार्गिंग वॉकला गेले आणि एका कारमध्ये त्यांना बसवून नेण्यात आले. हा प्रकारही सीसीटीव्हीमुळे उघड झाला. सकाळी त्यांच्या घराशेजारून त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. या घटनेस आता २४ तास झाल्यानंतर पोलिसांना अजून काही सुगावा लागला नाही.
सतीश वाघ यांचे अपहरण कशासाठी केले? हा एक प्रश्न आहे. कारण त्यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्या कुटुबियांना फोनसुद्धा झाला नाही. सरळ संध्याकाळी त्यांचा मृतदेह मिळाला. त्यांच्या हत्येसाठी बंदुकीचा वापर केलेला दिसत नाही. तीक्ष्ण हत्याराने त्यांना मारल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी या हायप्रोफाईल हत्येचा तपास सुरु केला आहे. १६ पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली असताना तांत्रिक तपास केला जात आहे. सतीश वाघ यांना कोणाची फोन आली होती का? त्यांचे काय बोलणे झाले? ते सुद्ध तपासले जात आहेत. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, हत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. अपहरणकर्त्यांनी ज्या गाडीत सतीश वाघ यांचे अपहरण झाले ती गाडी पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेकडे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले होते. त्यामुळे तपासासाठी पोलिसांची १६ पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. तसेच उरुळी कांचन, यवत, केडगाव व पाटस परिसरात गस्त घातली जात आहे.