कॉल करण्यासाठी फोन मागितला, अन् मोबाईल घेऊन चोरटा प्रसार, पुढे आणखी काय घडले वाचा

| Updated on: Jul 28, 2023 | 1:39 PM

Pune News : पुणे शहरातील एक फसवणुकीचा अजब प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका युवकाची दोन वेळा फसवणूक झाली आहे. आधी कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला अन् चोरटा मोबाईल घेऊन फरार झाला. पुढे...

कॉल करण्यासाठी फोन मागितला, अन् मोबाईल घेऊन चोरटा प्रसार, पुढे आणखी काय घडले वाचा
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला जिवंत जाळले
Follow us on

पुणे | 28 जुलै 2023 : ‘नेकी कर दरिया में डाल’, अशी हिंदीतील प्रसिद्ध म्हण आहे. या म्हणीप्रमाणे अनुभव पुणे शहरातील एका २९ वर्षीय युवकास आला. त्याच्याकडून एकाने आधी मदत मागितली. ती मदत करताच कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. त्या व्यक्तीने दुसऱ्यांदा मदत दिली. मग तो भामटा मोबाईल घेऊन फरार झाला. पुढे जाऊन आणखी एकाने त्याची फसवणूक केली. एकाच दिवशी दोघांनी फसवणूक करण्याचा हा अजब प्रकार घडला.

काय आहे प्रकार

पुणे शहरात २० जुलै रोजी ही घटना घडली. २९ वर्षीय युवक नोकरीसाठी पुण्यात आला होता. घटना घडली त्यावेळी तो गाडीने घरी जात होता. रस्त्यात एका व्यक्तीने त्यास थांबवले. त्याने म्हटले, मला बुलढाणा जाण्यासाठी पैसे नाही. मला मदत करा, असे सांगितले. त्यानंतर त्या युवकाने तातडीने त्यास ५०० रुपये ट्रॅन्सफर केले. त्यानंतर त्याने कॉल करण्यासाठी फोन मागितला. त्या युवकाने त्यास फोन देताच तो फरार झाला.

दुसऱ्यांदा असे काही घडले

फोन चोरी झाल्याची घटना घडताच युवकाने पोलिसांत धाव घेतली. त्यावेळी रस्त्यात त्या युवकाला आणखी एक चोर भेटला. त्याने सांगितले की, पोलीस अधिकारी माझे मित्र आहेत. तुझे काम लवकर होईल. त्यानंतर त्या युवकासोबत तो चोर बाईकवर पोलीस ठाण्यात पोहचला. चोरने म्हटले की, पोलिसांसाठी सिगरेट घ्यावी लागले अन् ती घेण्यासाठी त्या युवकाला पाठवले. तो सिगरेट घेण्यासाठी जाताच चोर बाइक घेऊन प्रसार झाला.

हे सुद्धा वाचा

युवकाने दोन्ही घटनांची तक्रार पोलिसांत केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.