MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने मागितली दहा लाखांची खंडणी, पुढे काय झाले?

| Updated on: Aug 05, 2023 | 3:21 PM

Pune Crime News : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने धक्कादायक प्रकार केला आहे. या विद्यार्थ्याने दहा लाखांची खंडणी मागितली आहे. त्या विद्यार्थ्याने हा प्रकार का केला? यासंदर्भात पोलिसांना काय संशय आहे...

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने मागितली दहा लाखांची खंडणी, पुढे काय झाले?
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला जिवंत जाळले
Follow us on

अभिजित पोते, पुणे | 5 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आहेत. रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेची तयारी हे विद्यार्थी करतात. त्यातील काही जणांना यश मिळते. काही जणांचे पुन्हा प्रयत्न सुरु असतात. परंतु एका विद्यार्थ्याने वेगळाच प्रकार केला आहे. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्याने खंडणी मागितली आहे. ही खंडणी तब्बल दहा लाखांची होती. एका हॉटेल व्यावसायिकाकडून ही खंडणी त्याने मागितली. पुढे हॉटेल व्यावसायिकाने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला.

काय आहे प्रकार

पुणे शहरातील कोरेगावपार्क भागात हा प्रकार घडला. कोरेगावपार्कमधील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी ३७ वर्षीय व्यावसायिक थांबले होते. जेवण झाल्यावर ते घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांच्या कारवर १० लाखांच्या खंडणीसंदर्भात चिठ्ठी चिकटवली मिळाली. दहा लाख रुपये न दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी त्या चिठ्ठीच्या माध्यमातून दिली. त्यानंतर या प्रकरणी आरोपी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार बारामतीचे रहिवासी आहेत. त्यांचा हॉटेल व्यावसायासोबत जमीन खरेदी विक्रीचा व्यावसाय आहे.

कोणी केला हा प्रकार

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. तपास करत पोलीस सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागात पोहचले. या ठिकाणी वेळापूर येथून श्रीनाथ शेडगे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. श्रीनाथ शेडगे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यानेच ही हिंदी मजकुराची चिठ्ठी लिहिली होती.

हे सुद्धा वाचा

का केला हा प्रकार

श्रीनाथ शेडगे हा गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. परंतु त्याला अद्याप यश आले नव्हते. त्याचे कर्ज वाढत होते. तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. श्रीनाथ शेडगे याने अजून असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणे विद्यार्थी गुन्हेगारीकडे का वळत आहे? यावर चिंता व्यक्त होत आहे.