भयानकच, नवजात बालकास रस्त्यावर सोडले, रडू नये म्हणून बांधली प्लास्टिकची पिशवी

| Updated on: Dec 10, 2024 | 3:29 PM

रस्त्यावर सोडलेले बाळ हे अनैतिक संबंधातून जन्माला आल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या मातेने ते रस्त्यावर फेकून दिले असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु रस्त्यावर टाकताना त्या बालकाच्या तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधण्याचे कृत्य करुन माया, ममता या शब्दांना तिने तिरांजलीच दिली.

भयानकच, नवजात बालकास रस्त्यावर सोडले, रडू नये म्हणून बांधली प्लास्टिकची पिशवी
क्राईम न्यूज
Follow us on

Pune Crime News: ‘पुणे ते काय उणे’ अशी म्हण असलेल्या शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नवजात बालकाला जन्म देवून देऊन रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर ते बालक रडू नये म्हणून त्याच्या तोंडावर प्लास्टिक पिशवी बांधली. हा प्रकार त्या नवजात बालकाच्या मातेनेच केला असण्याची शक्यता आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमध्ये ही घटना घडली. दरम्यान, त्या बालकास रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

शेजारील लोकांचा पोलिसांना फोन

पुण्यात नवजात बालकाला जन्म देवून रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर त्या बालकाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडावर बांधली प्लास्टिकची पिशवी बांधली. सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला. त्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. आता त्या बालकाची प्रकृती स्थिर आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून गुन्हा दाखल

रस्त्यावर सोडलेले बाळ हे अनैतिक संबंधातून जन्माला आल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या मातेने ते रस्त्यावर फेकून दिले असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु रस्त्यावर टाकताना त्या बालकाच्या तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधण्याचे कृत्य करुन माया, ममता या शब्दांना तिने तिरांजलीच दिली. दरम्यान या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोध सिंहगड पोलीस करत आहेत.