पिंपरी – अलीकडच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये रोड रोमिओ तसेच गाव गुंडांनी उच्छाद मांडलेला आहे. सातत्यानं शहराच्या विविध भागात टोळक्यानं फिरत सर्वसामान्य नागरिकांवर दहशत बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग त्यासाठी कधी नंग्या तलवारी घेऊन फिरणं, तर कधी शुल्क कारणावरून सर्व सामान्य नागरिकाला मारहाण करणं , महिलांची छेड- छाड करणं यासारख्या घटना सातत्यानं घडताना दिसून येतात. अशी एक घटना काल (शनिवारी) मध्यरात्री पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली आहे. 3 ते 4 जणांच्या टोळक्यानं दगड व लोखंडी शस्त्राच्या मदतीनं गोंधळ घालत 8-9 वाहनांची तोडफोड केल्याचे उघडकीस आलं आहे.
आहेर गार्डन मंगल कार्यालयाजवळ आणि स्पाईन रोड परिसरात घडलेल्या या घटनेत मिनीबस, कार, दुचाकींचे नुकसान झालं आहे. या घटनेनंतर पीडितांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.याप्रकरणी दोन ते तीन अज्ञात इसमाच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपींनी घटना स्थळावरून पळ काढला असून पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.
शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास दोन ते तीनजण वाहनांची तोडफोड करत असल्याचं फिर्यादी यांच्या निदर्शनास आलं . तोडफोडी बद्दल आरोपींनी जाब विचारला असता त्यांनी फिर्यादीलाच धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. फिर्यादीच्या खिशातील 800 रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी स्पाईन रोड परिसरात उभ्या केलेल्या अनेक बसेसच्या काचाही आरोपींनी फोडल्या. पाेलिसांच्या रेकॉर्डप्रमाणे परिसरातील नऊ वाहनांची आरोपींनी तोडफोड केली आहे. यामध्ये वाहने नुकसान झालं आहे. सातत्यानं होणाऱ्या या घटनांकडं पोलीस प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना गुंडांच्या होणारा त्रास थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा आग्रही नागरिकांकडून करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; ५२ लाखांच्या विदेशी मद्यासह एकाला अटक
तब्बल 500 कोटींची बिले थकल्याने नाशिक पालिकेचा तोळामासा; अवघ्या 98 कर्मचाऱ्यांवर मदार
बुलढाणा सहकारी पतसंस्थेत सापडलेले 53.72 कोटी कुणाचे?; किरीट सोमय्यांचा सवाल