पिंपरी चिंचवड : लहान मुलीला दुचाकीवरुन घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पाच ते सहा युवकांनी थेट सीमेंट ब्लॉकने या व्यक्तीवर आणि लहान मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी रस्त्याच्या लगतच असलेल्या एका हॉटेलमध्ये ही व्यक्ती घुसलील. हॉटेल मालकाने माणुसकी दाखवत ग्रील बंद केल्यानं थोडक्यात बापलेकीचा जीव वाचलाय. ही थरारक घटना सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झालीय. पिंपरीतल्या (Pimpri Chinchwad Crime News) जयहिंद कॉलेज (Jayhind Collage) इथं हा धक्कादायक प्रकार घडलाय.
सोमवारी रात्री 9 ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय. सध्या पिंपरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय.
पिंपरी तुफान राडा, किरकोळ कारणावरुन भांडण होऊन जीवघेणा हल्ला pic.twitter.com/Jyz6DJriFj
— Siddhesh Sawant (@ssidsawant) November 22, 2022
पिंपरी येथील जयहिंद कॉलेजच्या कॉर्नरला दुचाकी घासली गेल्यानं काही युवत संपातले. त्यांनी छोट्या मुलीबरोत जात असलेल्या व्यापाऱ्यावर सीमेंट ब्लॉक फेकले आणि त्यांच्यावर हल्ला केला.
यावेळी व्यापारने समोरच असलेल्या ज्वेल्स नावाच्या हॉटेलात घुसून स्वतःचा आणि चिमुकलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. हॉटेल मालकानेही ग्रील्स लावल्याने बाप लेकीचा जीव अगदी थोडक्याच वाचलाय.
पिंपरी चिंचवडमध्ये भर रस्त्यात दहशत माजवण्यासारखे प्रकार वाढलेत. त्यातच सोमवारी रात्री घडलेल्या संतापजनक प्रकाराने लोकांची भीती आणखी वाढलीय. या घटनेवेळी रस्त्यावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. आता प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.