पिंपरी : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. ‘भाई … का म्हटले नाही’ म्हणून एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती. मारहाणीवरच हे प्रकरण थांबले नाही, तर कुत्रे ज्या पद्धतीने बिस्किट खातात त्यापद्धतीने या तरुणाला बिस्कीटे खायला भाग पाडण्यात आले होते. सोशल मीडियावर (Social Media ) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Pampiri Chinchwad Police) या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रोहन वाघमारे (Rohan Waghmare) आणि त्याच्या साथीदारांची पोलिसांनी वाकड परिसरातून धिंड काढत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले असून, यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल असे म्हटले आहे. रोहन वाघमारे याला संबंधित पीडित तरुणाने भाई न म्हटल्याने हा वाद झाला होता. आरोपीने आपल्या साथिदारांसह संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच जमीवर पडलेले बिस्कीट त्याला तोंडाने उचलायला लावले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता. घटनेच्या वेळी आरोपी रोहनने पीडित तरुणाला भेटायला बोलावले. पीडित तरुण भेटायला गेल्यानंतर आरोपीने संबंधित तरुणाला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरुणाला शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनींही तरुणाला शिवीगाळ करत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली होती.
दरम्यान या प्रकरणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींना तब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी आज या आरोपींची भररस्त्यात धींड काढली आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले असून, यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल असे म्हटले आहे.
रुद्र बी टू वाघाची शिकार! आता आणखी 4 आरोपींना बेड्या, का करण्यात आली वाघाची हत्या?
वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Terrible accident | पुण्यातील जुन्नर रोडवर भरधाव स्कार्पिओवरील चालकाचा ताबा सुटला अन जे झालं ते ….