पिंपरी – शहारात युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख असलेल्या प्रतीक्षा घुलेंच्या उपस्थितीत 50 वर्षीय महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हेतर मारहाण करण्याबरोबरच जेसीबीच्या साहाय्याने महिलेचे घरही पाडण्यात आले. याबाबत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे.
नेमक काय घडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता नंदकिशोर बिलोरीये (वय 50, बोपखेल) या घटनेच्यावेळी घरात काम करत होत्या. त्याचवेळी आरोपी घरात आले व त्यांनी तुमची जागा बिल्डरला डेव्हलपमेंटसाठी दिली आहे. त्याचे काम सुरु करण्यासाठी पॉवर ऑफ ॲटर्नीवर गुपचूप सही कर. नाहीतर तुला जाळून टाकू अशी धमकीदिली. मात्र पीडित फिर्यादीने सही कारण्यास नकार दिल्यानं आरोपीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी अमित भिवाल, नीलेश भिवाल, विवेक लवेरा, सनी भिवाल, प्रियंका भिवाल, सोनू लवेरा, निकिता पिल्ले, प्रतीक्षा घुले (रा. बोपखेल) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी सनी भिवाल याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जेसीबीने पडले घर
घटनेच्या दरम्यान मारहाण करण्याबरोबरच आरोपींनी पीडितेला घराच्या बाहेर काढले. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने पीडितेच्या घर पाडून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर घर पाडू न देण्यासाठी जेसीबीलाआडवा गेलेल्या त्यांच्या मुलालाही यावेळी मारहाण करण्यात आली आहे. यात मुलगा जखमी झाला आहे.
मला बदनाम करण्याचा प्रयत्न
माझ्यावरील आरोप हे राजकीय षडयंत्र असून , यातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
PM Security | चौकशीसाठी SIT स्थापणार का, केंद्र-पंजाब सरकार सुप्रीम कोर्टात काय बाजू मांडणार?
मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग सुरु, एकनाथ खडसेंचं डोक फिरलंय : गिरीश महाजन