पिंपरी- शहरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. यावेळी आरोपीकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त केली आहेत. या टोळीतील आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
अशी केली कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दरोड्याच्या तयारीत वडमुखवाडीतील कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ जमणारअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाने सापळा रचत तिघांना अटक केली. काश अनिल मिसाळ (वय 21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय 30, रा. मु. पो. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय 26, रा. पाषाण, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. करण आणि सनी हे दोघे आरोपी अद्याप फार आहेत. दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर ज्ञानदेव शेडगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या करवाई दरम्यान पोलिसांनी फोन, मिरचीपूड, नायलॉन दोरी, असा वस्तू आढळलया आहेत.
आरोपीची गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे का? यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद त्यांच्यावर आहे. याची माहिती मिळवली जात आहे. शहरात वाढते गुन्हे रोखन्यायासाठी पोलीस प्रशासन सर्तक झाले आहे. विविध ठिकाणी छापे मारी करतही गुन्हेगारांची धारपदक केली जात आहे या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
VIDEO: दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुलींच्या लग्नाचं वय किती असावं? जगभरातील देशात असलेले एकापेक्षा एक कायदे
Dombivali Crime: मोटारसायकलने फोडले लूटीचे बिंग, चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक