पुणे : पुण्यात एक असं प्रकरण घडलंय (Pune Crime) जे बघून कोणीही डोक्याला हात मारेल. एक पोलीस (Police Officer Arrested) पन्नास हजारांची लाच घ्यायला गेला आणि थेट एसीबीच्या जाळ्यात आला. तेही पोलीस उपनिरीक्षक पदी असलेला अधिकारी एसीबीने रंगेहात पकडला आहे. पुण्यातल्या लाचखोर (Bribe) प्रकरणाने पुन्हा खळबळ वाजली आहे. मात्र हे प्रकरण पकडलं कसं याची कहाणीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे. यासाठी एसीबीकडूनही जबरदस्त ट्रॅप लावला होता. सरकारी अधिकारी किंवा पोलीस लाच घेताना पकडले जाण्याची प्रकरणं जरी नवीन नसली तरी हे प्रकरण जरा वेगळं आहे. त्याला काही कारणेही तशीच आहेत. जो तक्रारदार न्यायाच्या अपेक्षेने या पोलीस अधिकाऱ्याकडे आला होता, त्यालाच गंडा घालण्याचा डाव या पोलीस अधिकाऱ्याचा होता.
एका फसवणूक प्रकरणातील पैसे परत मिळवण्यासाठी हा तक्रारदार या पोलीस अधिकाऱ्याकडे फेऱ्या मारत होता, मात्र हे पैसे परत मिळवून देण्यासाठी या बाहदराने थेट त्याच्याकडे 50 हजाराच्या लाचेची मागणी केली आणि ही मागणी स्वीकारत असताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या उपनिरीक्षकावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सागर दिलीप पोमण असे या अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्रीही जबरदस्त कारवाई केली. यात या तक्रारदारानेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कल्पना दिली होती. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे काम आणखी सोपं झालं.
यातल्या या प्रकरणातल्या तक्रारदाराचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायातच त्याची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत त्याने पोलीसात तक्रार दिली होती आणि तेच पैसे परत मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र या प्रकरणात तक्रारदारांनी आर्थिक फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यासाठीच ही लाथ मागण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या ट्रॅपमध्येही हा लाच घेत असताना रंगेहात पकडला गेल्याने या पोलिस अधिकाऱ्याकडे दुसरा कोणता मार्ग उरलेला नाही. एका हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.