पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांकडून (Pune Police) करण्यात येणाऱ्या धडक कारवाईनंतरही कोयता गँगची दहशत सुरु आहे. यामुळे पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या (police tranfer)बदल्या केल्या आहेत.
सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या केल्याचे म्हटले आहे. तीन सहायक पोलिस आयुक्त आणि १३ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना नवीन ठिकाणी पाठवले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. ACP सुनील पवार, गजानन टोम्पे, राजेंद्र गलांडे यांची बदली केली आहे.
कोणाला कुठे दिली बदली
पोलिस निरीक्षक, पूर्वीचे ठिकाण पदस्थापना ठिकाण कंसात –
१. संतोष पाटील- बीड (बंडगार्डन पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
२. भाऊसाहेब पठारे- नाशिक ग्रामीण (वानवडी पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
३. चंद्रशेखर सावंत- गुन्हे अन्वेषण विभाग (पोलिस आयुक्त यांचे वाचक)
४. भरत जाधव- विशेष शाखा (गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग)
५. विजय कुंभार- सामाजिक सुरक्षा विभाग (भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
६. संतोष सोनवणे- वाहतूक शाखा (कोंढवा पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
७. मनोहर इडेकर- विशेष शाखा (वाहतूक शाखा)
८. ब्रम्हानंद नाईकवाडी- नियुक्तीच्या प्रतीक्षेत (चतु:शृंगी पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
९. संदीप भोसले- गुन्हे शाखा (भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, पोलिस निरीक्षक, गुन्हे)
१०. सुनील जाधव- गुन्हे शाखा (वाहतूक शाखा)
११. प्रताप मानकर- वरिष्ठ निरीक्षक बंडगार्डन (गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक)
१२. श्रीहरी बहिरट- वरिष्ठ निरीक्षक भारती विद्यापीठ (गुन्हे शाखा युनिट ३)
१३. बालाजी पांढरे- वरिष्ठ निरीक्षक चतु:शृंगी (गुन्हे शाखा युनिट १)
सहायक आयुक्तांच्या बदल्या (पूर्वीचे ठिकाण पदस्थापना ठिकाण कंसात)
१. सुनिल विष्णू पवार – सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग (सहायक पोलीस आयुक्त गुन्हे)
२. गजानन बाळासाहेब टोंपे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 ( सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग)
३. राजेंद्र वसंत गलांडे, सहायक पोलीस आयुक्त प्रशासन (सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग)