pune porsche accident: पुणे अपघात प्रकरणात चौफेर टीकेनंतर पोलीस कामाला, दहा पथके करणार अपघाताचा तपास

| Updated on: May 24, 2024 | 7:48 AM

pune porsche accident: अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात पिझा आणि बर्गर दिल्याचा आरोप होत आहे. पोलीस ठाण्यात कोणी राजकीय दबाव आणला का याची चौकशी केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळ, पब आणि पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे.

pune porsche accident: पुणे अपघात प्रकरणात चौफेर टीकेनंतर पोलीस कामाला, दहा पथके करणार अपघाताचा तपास
पुणे अपघातात अल्पवयीन मुलाने वापरलेली पोर्श कार आणि अपघातात मृत्यू झालेले युवक, युवती.
Follow us on

पुणे कोरेगाव पार्क भागातील कल्याणीनगरमध्ये बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने विनानंबरच्या शानदार पोर्श गाडीने दोघांना उडवले. या अपघातात मोटारसायकलवरील तरुण, तरुणीची मृत्यू झाला. त्यानंतर पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. एफआयआरमधील कलम नोंदवण्यापासून त्या अल्पवयीन मुलास निबंध लिहिण्याची शिक्षा दिल्यानंतर…सर्वच प्रकारानंतर समाजात आणि माध्यमांमध्ये चौफेर टीका झाली. अखेर या प्रकरणात पुणे पोलिसांना भूमिका बदलत आक्रमक तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांची दहा पथके तपास करणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला अटक केली आहे.

पोलिसांनी केली दहा पथके तयार

कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी 10 पथके तयार केली आहेत. एकूण 10 पथकांकडून पुण्यातील अपघाताचा तपास होणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून पथकातील पोलीस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. तपासाबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पथकाला त्यांची जबाबदारी आणि काम ठरवून देण्यात आले आहेत.

पुणे पोलीस मागणार आरोपींची कोठडी

पुणे पोलिसांनी या गुन्ह्यात नव्याने कलम ६५ (ई) आणि कलम १८ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम या दोन कलमाचा समावेश आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पुणे पोलीस न्यायालयात करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पब विरोधात गुन्हा दाखल करणार

पुणे पोलीस या प्रकरणांचे मुळ असणाऱ्या पबकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. २ पब विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. परवाना नसताना सुद्धा त्या दोन पबकडून दारू सर्व्ह केली जात होती. यामुळे पुण्यातील वाढलेली पब संस्कृतीवर आता कायदेशीर बंधने येण्याची शक्यता आहे.

ती गाडी सुरेंद्र अगरवाल यांची

अपघातात वापरण्यात आलेली ती महागडी गाडी सुरेंद्र अगरवाल यांच्या कंपनीच्या मालकीची आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्याच सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही तपासून तपास केला जाणार आहे.

त्या अधिकाऱ्यांची चौकशी

अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात पिझा आणि बर्गर दिल्याचा आरोप होत आहे. पोलीस ठाण्यात कोणी राजकीय दबाव आणला का याची चौकशी केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळ, पब आणि पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे.