मद्यधुंद अवस्थेत अती वेगाने गाडी चालवणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडले, पुण्यात मध्यरात्री थरार

| Updated on: May 19, 2024 | 1:16 PM

Pune Crime News: कल्याणी नगर विमाननगर परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल व पब्ज सुरु असतात. एकीकडे रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे भीषण अपघात घडत आहेत.

मद्यधुंद अवस्थेत अती वेगाने गाडी चालवणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडले, पुण्यात मध्यरात्री थरार
पुण्यातील अपघातातील कार
Follow us on

पुणे शहरात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत दोघांना घडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हा भीषण अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकीवर असलेली मुलगी हवेत उडली. त्यानंतर जमिनीवर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत दोघे राजस्थानमधील

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या मालकाच्या अल्पवयीन मुलाने अत्यंत बेदरकारपणे आलिशान गाडी चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघांना चिरडले. अपघातातील अनिस अवलिया याचा उपचार सुरू असताना तर अश्विनी कोस्ता हिचा जागीच झाला. हे दोघेही राजस्थानमधील होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या मोटारसायकल वरून कल्याणीनगरकडून येरवड्याकडे मित्रांसह जात होते. त्यावेळी पोर्से या आलिशान कार याच रस्त्याने भरधाव वेगात निघाली होती. कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या गाडीने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. यामध्येच दोघांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर

या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कल्याणी नगर भागात झालेल्या अपघाताची पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी 200 च्या स्पीडने होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर कारमधील एअर बॅग उघडल्या होत्या. कारमधून तीन मुले बाहेर पडले. लोकांनी त्यांना चांगलाच चोप दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी लोकाने सांगितले.

रात्री वेगाने वाहन चालवण्याच्या अनेक घटना

दरम्यान मदयधुंद अवस्थेत रात्री उशिरा वेगाने वाहन चालवण्याच्या घटना पुण्यात वाढत आहेत. कल्याणी नगर विमाननगर परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल व पब्ज सुरु असतात. एकीकडे रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे भीषण अपघात घडत आहेत.