योगेश बोरसे, पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | पुणे शहरात शुक्रवारी भरदिवसा गोळीबाराचा थरार झाला. तीन हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याची भरदुपारी हत्या केली. या हत्या प्रकरणाचा सूत्रधार केवळ वीस वर्ष वय असलेला साहिल पोळेकर आहे. शरद मोहोळ आणि साहिल यांचे घर अगदी दोनशे मीटर अंतरावर होते. साहिल याच्या मनात अनेक दिवसांपासून शरद मोहोळ याच्या हत्येचा विचार असण्याची शक्यता आहे. यामुळे साहिल पोळकर आधी शरद मोहोळसोबत राहणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला. त्यानंतर तो शरद मोहोळ गँगमध्ये सामील झाला, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोकळे यांनी या हत्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद घेतली.
हत्या करणारे आरोपी शरद मोहोळसोबत होते. त्याच्यासोबत असलेल्या आणि बाहेर थांबलेल्या तीन आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. शरद मोहळ याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर असलेल्या साक्षीदारांची चौकशी केली. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर शिरवळ येथे आठही आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून तीन पिस्तूल जप्त केले आहे. साहिल पोळेकर याचे मामा नामदेव कानगुडे आणि दुसरे नातेवाईक विठ्ठल किसन गांजने यांचे शरद मोहोळसोबत वैमनस्य होते. त्यातून ही हत्या झाली आहे.
दुचाकीवरुन फरार झाला. त्याच्यावरुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्याकडे कार असल्याचे सांगितले. त्यावरुन आरोपींचा शोध सुरु केला. त्यानंतर ते शिरवळ येथे मिळाले. या ठिकाणी आठही जणांना अटक करण्यात आली. आरोपी चार महिन्यांपूर्वी हे पिस्तूल घेऊन आले होते. याच पिस्तूलने शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. मुख्य आरोपी पोळेकर याने पिस्तूल जमा केले होते. अटक करण्यात आलेले अनेक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा
दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? लग्नाच्या वाढदिवशी शरद मोहोळचे पत्नीसाठी स्टेट्स