पुणे | 29 जुलै 2023 : सायबर चोरीच्या घटनांमध्ये दिवसंदिवस वाढ होत आहे. सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली जात असताना बँकेला सायबर ठगाने लक्ष केले आहे. पुणे शहरातील बँकेचा एटीएम कार्डचे क्लोन तयार करण्यात आले. त्यानंतर विविध शहरातील एटीएममधून मोठी रक्कम काढण्यात आली. 2020 ते 2021 मधील हा प्रकार आता समोर आला आहे. यामुळे बँकेला मोठा हादरा बसला आहे. कारण ही रक्कम थोडी नाही. सायबर ठगांनी एक कोटींहून अधिकची रक्कम लंपास केली आहे.
पुणे शहरातील भारती सहकारी बँकेसंदर्भातील हा प्रकार घडला आहे. बँकेच्या सायबर यंत्रणेवर हा हल्ला झाला होता. बँकेच्या या अडचणीचा फायदा घेऊन सायबर ठगांनी 439 एटीएम कार्ड्सचे क्लोन तयार केले. त्यानंतर भारती सहकारी बँकेची 1 कोटी 15 लाख 700 रुपयांची रक्कम विविध शहरांमधून लंपास केली.
सायबर ठगांनी 17 डिसेंबर 2020 ते 1 नोव्हेंबर 2021 या काळात विविध बँकेच्या एटीएम कार्ड्सचे क्लोन तयार केले. त्यात नामांकीत बँकेचाही समावेश आहे. त्यानंतर भारती सहकारी बँकेच्या विविध पुणे शहरातील आणि देशातील विविध शहरांमधील शाखेतून रक्कम काढली. एकूण 1 कोटी 8 लाखांची रक्कम काढली गेली आहे.
देशातील विविध शहरांमधून ही रक्कम काढली आहे. त्यात नवी मुंबई, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर,वरळी, नवी दिल्ली शहरांचा समावेश आहे. एकूण 1247 ट्रॅन्झॅशन करण्यात आले आहे. आता या प्रकरणी आता बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये इतर बँकेतून पैसे काढण्यात आल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केल्या. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. इतर बँकेची जबाबदारी त्या बँकांची असणार आहे, असे बँकेचे व्यवस्थापक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.