Pune Mini Bus Fire: पुणे शहरातील हिंजवाडीत बुधवारी मोठी दुर्घटना घडली होती. व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो) आग लागली होती. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना अपघात असल्याचे म्हटले जात होते. परंतु पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बस चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच टेम्पोला आग लावल्याचे समोर आले. त्याने त्यासंदर्भात पोलिसांकडे कबुलीजबाब दिला. त्यात मालकाने पगार थकवल्याच्या रागातून ही घटना घडली. त्यामुळे पोलीस चौकशीसाठी व्युमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेन शाह यांच्यापर्यंत पोहचले. शाह यांनी पोलिसांना जनार्दन हंबर्डीकर याचा पगार थकला नसल्याचे सांगितले.
व्युमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेन शाह माध्यमांशी बोलताना म्हणाले, बस दुर्घटनेचा आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरु शकलो नाही. काही कर्मचारी १९८५ पासून कार्यरत होते. सर्व कर्मचारी आम्ही एका परिवारासारखे राहत होतो. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना वैद्यकीय मदत करत आहोत. जनार्दन हंबर्डीकर याचा पगार थकलेला नव्हता. त्याला त्याला वेळेवर पगार दिलेला आहे. त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही, असा खुलासा मालक नितेन शाह यांनी केला.
कंपनीतून बेंझिनची चोरी झाल्याबाबत शाह यांना प्रश्न विचारला. एक लिटर की पाच लिटर बेंझिन चोरीला गेले? असे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, याबाबत मला कल्पना नाही. या प्रकरणात पोलीस चौकशी सुरु आहे. मी अधिक काही बोलू शकत नाही. तुम्ही पोलिसांना विचारा, असे सांगत मालक नितेश शाह यांनी काढता पाय घेतला.
पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने मिनी बस लावली होती. या मिनी बसमधून बुधवारी 12 कर्मचारी जात होते. त्यावेळी चालक जनार्दन हंबर्डीकर यांनी रागातून बेंझिन टाकून मिनी बसला आग लागली. त्याची तयारी त्याने एका दिवसापूर्वीच केली होती. या दुर्घटनेत सुभाष भोसले, (वय 42), शंकर शिंदे ( वय 60), गुरुदास लोकरे ( वय 40) आणि राजू चव्हाण (वय 40) या चौघांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा…