CBSE Scam : टीईटीनंतर राज्यात सीबीएसई शाळांचा घोटाळा, लाखा रुपयांमध्ये विकले बोगस प्रमाणपत्र

| Updated on: Jan 17, 2023 | 4:58 PM

राज्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शाळांना बनावट ना हरकत प्रमाणपत्र वाटप झाले आहे. हे प्रकरण उघड होताच ३ शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील ६६६ शाळांची तपासणी सुरु करण्यात आलीय.

CBSE Scam : टीईटीनंतर राज्यात सीबीएसई शाळांचा घोटाळा, लाखा रुपयांमध्ये विकले बोगस प्रमाणपत्र
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : Pune CBSE Scam : राज्यात टीईटी पात्रता घोटाळा (TET Scam) उघड झाल्यानंतर अनेक शिक्षकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यानंतर आता शिक्षण क्षेत्रातील नवाव घोटाळा समोर आलाय. राज्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शाळांना बनावट ना हरकत प्रमाणपत्र वाटप झाले आहे. हे प्रकरण उघड होताच ३ शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील ६६६ शाळांची तपासणी सुरु करण्यात आलीय.युडायस प्रणालीत ना हरकत प्रमाणपत्र अपलोड न करणाऱ्या शाळांना हे प्रमाणपत्र अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेय.

पुण्यात सीबीएसई शाळांना राज्य शासनाचे बोगस ना हरकरत प्रमाणपत्र (एनओसी) विकणारी टोळी कार्यकरत होती. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल केली गेली. या तक्रारीनंतर पुण्यातील एम. पी. इंटरनॅशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज, शिवाजीनगर , क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज आणि नमो आर आय एम एस इंटरनॅशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज या तीन शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

कसा केला प्रकार
राज्य मंडळाव्यतीरिक्त इतर मंडळांच्या अभ्यासक्रमाशी संलग्न शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची कारवाई राज्य सरकारकडून होते. परंतु पुण्यात काही शाळा व संस्था चालकांनी बनावट एनओसी प्रमाणपत्र मिळवले. या शाळांच्या एनओसीबाबतचे कोणतेही आदेश शासनाने काढले नव्हते. मंत्रालयतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बनवाट सह्या व शिक्के वापरुन ही प्रमाणपत्र दिली गेलीय. हा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षण विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही बनावट प्रमाणपत्र १२ लाख रुपयांना विकली गेलीय. काही अज्ञात व्यक्तीने दुसऱ्याच शाळेचा इनवर्ड क्रमांक टाकून पुण्यातील संस्थाचालकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले होते. हा घोटाळा मोठा असून यात अनेक मोठ्या माशांचा हात असण्याची शक्यता आहे.

 

राज्यातील ६६६ सीबीएसई शाळांची तपासणी

राज्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्र प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. आता यूडायस प्रणालीत माहिती न जुळणाऱ्या राज्यातील ६६६ सीबीएसई शाळांची तपासणी होणार आहे. तसेच या ६६६ शाळांच्या मान्यतेसंदर्भातील कागदपत्रे तपासण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबाबतचा अहवाल सादर झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.