गाणी लावून अश्लील नृत्य, लोणावळ्यात 8 महिलांसह 17 जणांवर कारवाई

| Updated on: Nov 15, 2021 | 9:13 AM

लोणावळ्यातील बंगल्यामध्ये काही महिला आणि पुरुष गाणे लावून अश्लील नृत्य करत असल्याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी 17 जणांवर कारवाई केली आहे. या 17 जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये 9 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.

गाणी लावून अश्लील नृत्य, लोणावळ्यात 8 महिलांसह 17 जणांवर कारवाई
Lonawala Crime News
Follow us on

पुणे : लोणावळ्यातील बंगल्यामध्ये काही महिला आणि पुरुष गाणे लावून अश्लील नृत्य करत असल्याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी 17 जणांवर कारवाई केली आहे. या 17 जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये 9 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय?

कार्लागावच्या हद्दीमध्ये एम.टी.डी.सी. जवळ दुर्गा सोसायटीमधील तन्वी नावाच्या बंगल्यामध्ये काही जण मोठ्याने गाणे लावून अश्लील पद्धतीने नाचत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली. यादरम्यान पोलिसांनी 17 जणांवर गुन्हा दाखल केला असून 74 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये 9 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. हे सर्व स्पीकरवर गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करुन नाचत होते. सदर ठिकाणाहून 9 पुरुष आणि 8 महिलांना ताब्यात घेत कारवाई केली. तसेच, त्यांच्याजवळील वाहने, फोन असा सुमारे 74 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.

संबंधित बातम्या :

जळगावमध्ये अज्ञात कारणावरुन तरुणाची गळफास घेत आत्महत्या

आधी बलात्कार, कृत्य उघडकीस येईल म्हणून हत्या, मृतदेह फ्रीजमध्ये लपवला, वाचा अल्पवयीन मुलासोबत काय घडले?

बिलासपूर : अल्पवयीन पालकांनीच नवजात बालकाला झुडुपात फेकले, पोलीस तपासात प्रकरणाचा उलगडा