Pune crime : जावईबापू निघाले संधी साधू! सासरी चोरी करणाऱ्या जावयाला हडपसर पोलिसांकडून अटक

| Updated on: Jul 19, 2022 | 2:16 PM

Pune Son in law arrested : मुख्य म्हणजे सासरचे कुणीच घरी नसताना जावयानं हा प्रताप केलाय.

Pune crime : जावईबापू निघाले संधी साधू! सासरी चोरी करणाऱ्या जावयाला हडपसर पोलिसांकडून अटक
जावई निघाला चोर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : महाराष्ट्रात जावयाला मोठा मान. जावई (Son in law) हे नातं असे आहे, की त्या नात्यासोबत आदर, सन्मान असं सगळं चालतच येतं. पण जावईच चोर निघाला तर मग? ऐकायचं विचित्र वाटत असलं, तरी असा खराखुरा प्रकार पुण्यात (Pune Crime News) घडलाय. जावयानं आपल्या सासरी चोरी केली. मुख्य म्हणजे सासरचे कुणीच घरी नसताना जावयानं हा प्रताप केलाय. जावयाकडच्या दुसऱ्या चावीने त्यानं सासरचं घर उघडलं. घरातील दागिन्यांवर हात साफ केला. पुण्याच्या हडपसरमध्ये (Pune Hadapsar) घडलेल्या या प्रकाराने सासरचे लोकंही चकीत झाले. अखेर पोलिसांना कळवण्यात आल. हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि अखेर चोर असलेल्या जावयाला पोलिसांनी अटकही केली. शिवाय त्याच्याकडून चोरीचे दागिनेही जप्त करण्यात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस सध्या पुढील कारवाई करत आहेत.

कोण आहे तो जावई?

निखिल पवार असं सासरी चोरी करणाऱ्या जावयाचं नाव आहे. निखिलने आपल्या कडे असलेल्या बनावट चावीने आपल्या सासरीच चोरी केली. बायकोच्या घरातली कुणीही घरी नाहीत, हे पाहून निखिलने आपल्याकडे असलेल्या बनावट चावीने फ्लॅटचा दरवाडा उघडला. घरातील मौल्यवान दागिन्यांवर हात साफ केला.

सासरचे गेले सिनेमाला आणि..

निखिलच्या सासरकडील सगळे लोक सिनेमा पाहण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी निखिलने सासरी घरात घुसून चोरी केली. निखिलच्या बायकोकडील नातलगांना शंका आल्यानंतर त्यांनी अखेर आपल्याच जावयाबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली. अखेर पोलीस तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून घेत हडपसर पोलिसांनी निखिल पवार याला अटक केली आणि त्याच्याकडून साडे तीन लाख रुपयांचे चोरीचे दागिनेही जप्त केले.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : रामदास कदम ढसाढसा रडले

चोरी झालेला मुद्देमाल पुन्हा निखिलच्या सासरकडच्यांना मिळाला. जावयानेच लज्जस्पद कृत्य केल्यानं निखिलच्या सासरच्या लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. सध्या निखिल पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अशाप्रकारे आणखीही काही चोऱ्या केल्यात का, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.