पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : पुणे विमानतळावरुन विविध शहरांकडे विमाने जात असतात. शुक्रवारी रात्री दिल्लीकडे जाणारे विमान तयार झाले. प्रवाशांची नेहमीप्रमाणे तपासणी झाली. विमानाने पुणे विमानतळावरुन टेकऑफ घेतले. दिल्लीला जाण्यासाठी विमान जात असताना एका प्रवाशाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे म्हटले. त्यानंतर धावपळ उडली. तातडीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. विमानाचे लँडिंग मुंबईला करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान मुंबईला लॅण्ड झाले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेत दीर्घकाळ विमान मुंबई विमानतळावर थांबले होते.
शुक्रवारी रात्री पुण्यावरुन दिल्लीकडे विमानाने टेकऑफ घेतले होते. त्यानंतर एका व्यक्तीने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती दिली. यामुळे विमानाचे लँडींग मुंबई विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विमानतळावर सुरक्षेची सर्व उपाययोजना करण्यात आली होती. मुंबई विमानतळावर उतरताच त्या व्यक्तीची आणि त्याच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली. परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू त्याच्याकडे निघाली नाही.
सीआयएसएफचे अधिकारी वीरेंद्रसिंह यांनी मुंबई पोलीस कंट्रोल रुमला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर BDDS टीम विमानतळावर आली. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याच्याकडे संशयास्पद काहीच मिळाले नाही. त्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. तेव्हा त्या व्यक्तीने आपल्या छातीत दुखत होते. आपणास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी बॉम्ब असल्याची माहिती दिल्याचे सांगितले.
विमानात त्या प्रवाशाचे नातेवाईक होते. त्या नातेवाईकाने पोलिसांना सांगितले की, त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांनी औषध घेतले होते. त्यानंतर ते काहीही बोलू लागले. दरम्यान पोलिसांनी संपूर्ण विमानाची पूर्ण तपासणी केली. त्यानंतर सकाळी सहा वाजता मुंबई विमानतळावरुन विमान दिल्लीकडे निघाले. या घटनेमुळे यंत्रणेची धावपळ उडली आणि प्रवाशांचा खोळंबा झाला. पोलिसांनी त्या व्यक्तील वैद्यकीय उपचारासाठी पाठवले असून त्यानंतर ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे.