पुणे – शहारात चोरीच्या , दरोड्याच्या घटना सातत्त्याने घडत असतात. मात्र चोरी करण्याच्या अनोख्या पद्धतीचा उलगडा पुणे पोलिसांनी नुकताच केला आहे. चोरी करण्यासाठी चक्क उत्तरप्रदेशातून विमाने पुण्यात यायचे चोरी करायचे अन पुन्हा विमाने परत जायचे असा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आतंरराज्य चोरट्यांना अटक केली आहे .
असे करायचे चोरी
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी परवेज शेर मोहम्मद खान (वय 43) आणि तस्लिम अरीफ समशूल खान (वय 23) हे दोघे उत्तरप्रदेशातून चोरी करण्यासाठी पुण्यात यायाचे. त्यानंतर शहरात रेकी करायचे. त्यानुसार घरफोडी करायचे लुटलेला ऐवज एकजण ट्रॅव्हल्सने घेऊन जायचा. तर गॅंगमधील उर्वरित लोक विमानाने पुन्हा उत्तरप्रदेशला जायचे. शहरातील चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस तपास करत असताना आंतरराजीय टोळी घरफोडीत सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार तपास करत असताना दोन चोरटे लोहगाव येथे थांबले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. इतर आरोपीचा पोलीस शोध घेता आहेत.
मुद्देमाल केला हस्तगत
अटकलेल्या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 130 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पकडण्यात आलेले दोन्हीही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत.
Imtiaz Jaleel : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक ज्ञानी, आम्हाला तर काहीच कळत नाही’
Panjab : दोन जीव एक शरीर, आई-वडिलांनी दिलेलं सोडून, पंजाब सरकारने दिली नोकरी
ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार?; सभागृहातही चर्चा