‘बिल्डर का बेटा हैं भाई, अबे तू भी तेरी माँ को….’, अश्लील भाषेतल्या रॅप साँगमुळे वातावरण तापलं

| Updated on: May 24, 2024 | 3:11 PM

एका तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तरुण एक रॅप साँग बोलताना दिसत आहे. पण या रॅप साँगमध्ये तो शिवीगाळ करताना दिसतोय. संबंधित तरुण अतिशय अर्वाच्य भाषेत या व्हिडीओत बोलताना दिसतोय. हा व्हिडीओ पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचा असल्याचा दावा केला जातोय. पण हा दावा अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी फेटाळला आहे.

बिल्डर का बेटा हैं भाई, अबे तू भी तेरी माँ को...., अश्लील भाषेतल्या रॅप साँगमुळे वातावरण तापलं
पुणे हिट अँड रन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
Follow us on

पुणे हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी हा 17 वर्षे 8 महिन्यांचा आहे. त्यामुळे त्याला प्रौढ म्हणून न्यायालयाने घोषित केलं नाही. पण एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओतला तरुण लोकांना उघडपणे शिवीगाळ करताना दिसतोय. संबंधित व्हिडीओतील मुलगा अतिशय अर्वाच्य भाषेत लोकांना शिवीगाळ करताना दिसतोय. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणातील अल्पवीयन आरोपी पहिल्यादिवशी जामीन मिळाल्यानंतर त्याने संबंधित व्हिडीओ बनवला, असा आरोप केला जातोय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतला तरुण एक रॅप साँगमधून लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसतोय. संबंधित व्हिडीओ हा पुणे अपघातातील आरोपीचा नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओची पुष्टी ‘टीव्ही 9 मराठी’ करत नाही. हा व्हिडीओ तांत्रिक गोष्टींचा वापर करुन बनवण्यात आल्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पोलीस तपासातून सविस्तर गोष्टी समोर येऊ शकतात. त्यामुळे संबंधित व्हिडीओतून लगेच अर्थ काढणं योग्य नाही. पोलीस तपासातून आता काय-काय गोष्टी समोर येतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

व्हिडीओतला तरुण नेमकं काय बोलतो?

“बारबार आ रहाँ हैं की, भाईने उडा दी दो लोगों की जान ले ली. 18 साल का लडका नशे में गाडी चला रहा था. जस्टिस…जस्टिस… कोई इस बारे में बात नहीं कर रहाँ. सारे बात कर रहें है मेरी फिडबॅक की एक लाईन बोलके हमेशा चले जाते हैं. कोई बात ही नहीं कर रहा इस बारे में. भाई एक काम करो ना, माँ XX XX XXX XX किसी बिल्डर X XX? एक बिल्डर पकडो, माँ XXX”, असं अर्वाच्य भाषेत व्हिडीओतला तरुण बोलताना दिसतोय.

पुण्याचं हिट अँड रन प्रकरण काय आहे?

दरम्यान, पुण्यात प्रसिद्ध उद्योगपती विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याच्या पौर्शे कारने एका बाईकला धडक दिली होती. त्याने धडक दिली तेव्हा त्याच्या गाडीचा वेग हा ताशी 200 किमी इतका होता. त्यामुळे दुचाकीवर असलेले तरुण-तरुणी लांबपर्यंत जावून कोसळले. या अपघातात बाईकवर असलेल्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीला अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव काही अटीशर्ती ठेवून जामीन मिळाला होता. पण सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यामुळे पोलिसांना कारवाई करणं भाग पडलं. जनतेचा दबाव वाढल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची दखल घ्यावी लागली. त्यांनी या प्रकरणी आरोपीवर कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलं.