पुणे | 26 ऑगस्ट 2023 : डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. पाकिस्तानी ललनाने त्यांना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांनी देशाची गुप्त माहिती दिली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर एटीएसने त्यांना अटक केली. प्रदीप कुरुलकर यांची कसून चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. परंतु प्रदीप कुरुलकर तपासाला सहकार्य करत नव्हते. त्यांच्या मोबाइलमधील डाटा त्यांनी डिलिट केला. तो अजूनही रिकव्हर झाला नाही. आता त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी सुरु आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेस गुप्तहेर महिले मार्फत गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर आहे. त्यांच्या जामीन अर्जास एटीएसने विरोध केला आहे. यासंदर्भात युक्तीवाद करताना कुरुलकर म्हणाले की, त्यांना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, तसेच ते पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधू शकतात, असा युक्तिवाद न्यायालयात एटीएसकडून करण्यात आला.
प्रदीप कुरुरलकर यांनी शत्रूराष्ट्राला गोपनीय माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. सरकारी पक्षाकडून युक्तीवाद सुरु असून बचाव पक्षाकडून युक्तीवाद होणार आहे. कुरुलकर यांच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी म्हणजे २९ ऑगस्ट परत सुनावणी होणार आहे. त्यावेळी त्यांना जेल की बेल? यासंदर्भात फैसला होण्याची शक्यता आहे.
प्रदीप कुरुलकर झारा दासगुप्ता नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेर महिल्याच्या संपर्कात आले होते. चॅटींग करताना त्यांनी आपली ओळख डीआरडीओमध्ये संचालक असल्याची करुन दिली होती. त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे होऊ लागले. या दरम्यान भारताच्या विविध प्रकल्पाची गोपनीय माहिती ईमेल आणि व्हॉट्सॲपमार्फत कुरुलकर यांनी त्या महिलेला दिली. प्रदीप कुरुलकर याच्या मोबाईलची तपासणी एटीएसने केली. मोबाईलमध्ये महिलांचे अर्धनग्न फोटो मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच कुरुलकर याने व्हॉटस ॲपवरूनचं मेल आयडी दिल्याचं उघड झाले आहे.