पुणे : पुणे शहराची ओळख देशात सांस्कृतिक राजधानी म्हणून झाली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पुण्याची ओळख बदलत आहे. १८ जून रोजी दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर दहा दिवसांनी सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला झाला होता. अगदी पेरुगेट पोलीस चौकीजवळ हा प्रकार घडला होता. त्यानंतर कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस निरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई पोलीस आयुक्तांनी केली आहे. हल्ला करणाऱ्या तरुणास लेशपाल जवळगे अन् इतरांनी धाडसाने रोखले. त्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणात हल्लेखोर शंतनू लक्ष्मण जाधव याला अटक केली गेली होती.
कॉलेजमध्ये प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे शंतनू जाधव याने त्या तरुणीवर हल्ला केला. मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील असणाऱ्या शंतनू लक्ष्मण जाधव याने हल्ला केला होता. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यामुळे त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. पोलीस चौकशीत त्याने हल्ला केल्याची कबुली दिली होती. तसेच त्याच्याजवळ असणारा कोयताही जप्त करण्यात आला होता.
शंतनू अन् ती युवती दोघे कॉलेजमधील मित्र होते. शंतनू याने त्या मुलाला प्रपोज केले. त्या तरुणीने त्याचा प्रस्ताव फेटाळला अन् शंतनू याच्याशी संवाद बंद केला. यामुळे शंतनू याने तिला ठार मारण्याची धमकी देणे सुरु केले. त्यानंतर २७ जून रोजी पेरुगेट पोलीस चौकीजवळ तिच्यावर हल्ला केला. यावेळी जीव वाचवण्यासाठी ती तरुणी धावत होती. मग लेशपाल जवळगे अन् इतरांनी शंतनू याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणात लेशपाल जवळगे आणि इतर युवकांनी केलेल्या धाडसाचे कौतूक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना पाच लाखांचे बक्षीस दिले. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी या युवकाचे कौतूक केले.
हे ही वाचा
पुणे कोयता हल्ल्यातून वाचलेल्या मुलीनेच सांगितली आरोपीची A to Z माहिती