अभिजित पोते, पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | पुणे शहरात MPSC टॉपर दर्शना पवार हिची प्रेम प्रकरणातून जून महिन्यात हत्या झाली होती. तिचा मित्र तिचा मित्र राहुल हंडोरे याने ही हत्या केली होती. या प्रकरणास काही महिने होत नाही, तोपर्यंत पुणे शहर एका हत्याकांडने हादरले होते. पुण्यात २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा युवक बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. महेश डोके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
महेश डोके याचा खून समलैंगिक संबंधातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. महेश वाघोली येथील एका महाविद्यालयमध्ये शिकत होता. तो वाढीबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. मंगळवारी सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आली. त्याच्या प्रकृतीची परिस्थिती पाहून त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
महेश डोके हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा अजूनही शोध घेत आहोत. आरोपीच्या शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जून महिन्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेली दर्शना पवार हिची हत्या तिच्या मित्रानेच केली होती. लग्नास नकार दिला म्हणून ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेरुगेट पोलीस चौकीजवळ युवतीवर कोयत्याने वार करण्याचा प्रकार घडला होता.