पुणे : पुण्यातील भावेश कांबळे या हत्या झालेल्या सराईत गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गुंड कांबळे याच्या चेल्यांनी तलवार, पिस्तूल हवेत फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अक्षय उर्फ प्रसाद शशिकांत कानिटकर (वय 22 वर्ष, रा. बिबवेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तलवार आणि पिस्तूल घेऊन धिंगाणा घालणाऱ्या अक्षयसोबत एकूण 10 ते 15 जण होते. (Pune murderd criminal Bhavesh Kamble followers celebrated his birthday with Sword and Pistol)
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, या प्रकाराची माहिती पोलीस कर्मचारी उत्तम तारू व मितेश चोरमाले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने प्रसाद कानिटकर या तरुणाला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बिबवेवाडी पोलिसांकडे दिले आहे.
इतर बातम्या :
नांदायला नकार देणाऱ्या पत्नीचे लांबसडक केस पतीने कापले, पिंपरीमध्ये विकृतीचा कळस
पुण्यात रिक्षा चालकाला मारहाण, फायनान्स कंपनी वसुली एजंटने मारल्याचा आरोप
(Pune murderd criminal Bhavesh Kamble followers celebrated his birthday with Sword and Pistol)