“एक फूल दो माली” हा 1970 च्या दशकातील चित्रपट. त्या काळात त्या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. देवेंद्र गोयल दिग्दर्शित हा हिंदी चित्रपट संपत लाल पुरोहित यांच्या दो कदम आगे या पुस्तकावर आधारित आहे. एकाच मुलीवर दोघांचे प्रेम होते, अशी त्या चित्रपटातील कथा होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड भागात घडली. परंतु त्या मुलीच्या प्रेमासाठी दुसऱ्या तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न त्या प्रेमवीराने केला. या प्रकरणातील तरुण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. दुसरीकडे पोलिसांनी अपघात घडवणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
पिंपरी- चिंचवडमधील एक प्रेम प्रकरण उघड झाले आहे. निलेश शिंदे आणि सुशील काळे हे दोन्ही एकाच मुलीवर प्रेम करत होते. या प्रेमप्रकरणामुळे एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश शिंदे आणि सुशील काळे या दोघांची एकच गर्लफ्रेंड आहे. परंतु सध्या त्या तरुणीने निलेश ऐवजी सुशील काळे याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले आहे. आता ती निलेशपासून लांब झालेली आहे. निलेश तिला त्रास देत होत असल्याचे ती सांगत होती. निलेशला तिच्या आणि सुशीलच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा तिने त्या तरुणीला भेटण्यास बोलवले. त्या तरुणीने ही माहिती सुशील याला दिला.
एक्स बॉय फ्रेंड निलेश तिला भेटायला येत आहे, यामुळे सुशील त्याचा काटा काढण्याची तयारी केली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता. त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.