दारुच्या व्यसनातून 14 वाहनांची चोरी, पुण्यात 52 वर्षीय चोराला बेड्या, एक कोटींचा मुद्देमाल सापडला

| Updated on: Jul 28, 2021 | 2:06 PM

वाहन चोराकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या आणि त्याची वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई करत तीन ट्रॅव्हल्स बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत

दारुच्या व्यसनातून 14 वाहनांची चोरी, पुण्यात 52 वर्षीय चोराला बेड्या, एक कोटींचा मुद्देमाल सापडला
पुण्यात सराईत वाहनचोर अटकेत
Follow us on

पिंपरी चिंचवड : पुण्यात सराईत वाहन चोरट्याला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल एक कोटी एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोराकडून जप्त करण्यात आला आहे. सुनिल वामन महाजन असे अटक केलेल्या 52 वर्षीय सराईत वाहन चोराचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

वाहन चोराकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या आणि त्याची वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई करत तीन ट्रॅव्हल्स बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दारूच्या व्यसनापोटी महाजन वाहन चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

14 वाहन चोरीचे गुन्हे उघड

या कारवाईमध्ये एकूण एक कोटी एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामुळे 14 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यातील एक वाहन चोरी करत असतानाची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कैद झाल्याने प्रकरण उघडकीस आले.

पुण्यात बाईक चोरताना सुनिल महाजन सीसीटीव्हीत कैद

 

सांगलीत बाईक चोर जाळ्यात

दुसरीकडे, घरफोडी, दुचाकी चोरी प्रकरणातील सराईत चोरट्याला सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आकाश सतिश कवठेकर (वय 24) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, लॅपटॉप असा 2 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुपवाड परिसरातील तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे.

कसा लागला छडा?

सांगली आणि मिरज विभागात जबरी चोरी, घरफोडी आणि मोटर सायकल चोरी यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एलसीबीने एक पथक तयार केले आहे. याबाबत माहिती घेत असताना सुतगिरणी टेकडीवर कमी दरामध्ये सोनं विक्री करण्यासाठी एक जण थांबला असल्याची माहिती पथकास मिळाली. पोलिसांनी छापा टाकून विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर बसलेल्या एकाला ताब्यात घेतले. त्याला दुचाकीची कागदपत्रे आणि गाडी मालकाबाबत विचारले असता उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला.

पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी कुपवाड येथून दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. कुपवाडमध्ये भारत सुतगिरणीजवळ असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमधून एक मोटर सायकल चोरल्याचे त्याने सांगितले. तर कुपवाडमध्ये एक बंद शेड फोडून तेथील लॅपटॉप आणि चार्जर चोरल्याचेही सांगितले

संबंधित बातम्या :

भंगारात सापडलेल्या स्कॉचच्या बाटल्यांतून बनावट मद्याची विक्री, मुंबईच्या दोघांना पुण्यात अटक

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून दागिने-पैशांची चोरी, मिरा रोडमधून मायलेकाला अटक

(Pune Pimpri Chinchwad Bhosari Bike thief arrested)