Pimpri Murder | अकरावीतील विद्यार्थ्याच्या हत्येचं गूढ उकललं, WhatsApp स्टेटसमधून खुन्नस दिल्याने चुलतभावाकडून खून

| Updated on: Dec 23, 2021 | 3:49 PM

लोखंडी हातोड्याने आधी विद्यार्थ्याच्या डोक्याच्या मागून आणि नंतर डोळ्यावर प्रहार करण्यात आला होता. त्यामुळे बंदुकीची गोळी झाडून हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत होतं.

Pimpri Murder | अकरावीतील विद्यार्थ्याच्या हत्येचं गूढ उकललं, WhatsApp स्टेटसमधून खुन्नस दिल्याने चुलतभावाकडून खून
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन
Follow us on

पिंपरी चिंचवड : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना अवघ्या काही तासात यश आले आहे. अल्पवयीन मुलाच्या चुलत भावानेच मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. पुण्यातील तळेगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात त्याचा मृतदेह सापडला होता.

काय आहे प्रकरण?

लोखंडी हातोड्याने आधी विद्यार्थ्याच्या डोक्याच्या मागून आणि नंतर डोळ्यावर प्रहार करण्यात आला होता. त्यामुळे बंदुकीची गोळी झाडून हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत होतं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

व्हॉट्सअॅप स्टेटसमधून खुन्नस

मयत विद्यार्थी नेहमी खुन्नस देत धमकावायचा, तसेच काही दिवसांपूर्वी फक्त 302 अशा आशयाचे स्टेटसही त्याने ठेवले होते. हे स्टेटस फक्त दोन्ही आरोपींनाच दिसत होते. त्यामुळे रागीट स्वभावाच्या विद्यार्थ्यावर त्याचा 19 वर्षीय सख्खा चुलत भाऊ कमलेश आणि त्याचा मित्र प्रकाश लोहार (वय 19 वर्ष) खार खाऊन होते. यातूनच विद्यार्थ्याचा काटा काढायचा कट या दोघांनी रचला होता.

विद्यार्थी घरी न आल्याने शोधाशोध

संबंधित विद्यार्थी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास आपल्या घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध केली, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात मृतदेह

विद्यार्थ्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह हा पोलीस ठाण्याजवळील एका बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात आढळला. विद्यार्थ्याचा कोणाशी कसलाही वाद नव्हता, असा दावा कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांकडे केला होता. त्यामुळे हत्या कोणी आणि का केली, हा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यामुळे तळेगांव दाभाडे पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला होता.

संबंधित बातम्या :

पिंपरीत अकरावीतील विद्यार्थ्याची हत्या, बंद पडलेल्या कारखान्याजवळ मृतदेह आढळला

इगतपुरीतील लग्नातून नववधूचे सोन्याचे दागिने लंपास, मुंबईत तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला म्हणत पतीने पत्नीला भोसकले; घटनेनंतर आरोपी फरार